अमरावती: मेळघाटातील बहुचर्चित प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी उपवनसंरक्षक यास न्यायमूर्ती एम. एस. गाडे यांच्या न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील आरएफओ आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमार हा रातोरात मेळघाटातून फरार झाला होता. मात्र अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याला मोठ्या शिताफिने २६ मार्चला नागपूर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यास अमरावती येथे आणून लगेच कालच सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. धारणी पोलिसांनी त्याचे जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणीनंतर अटक केली होती.

धारणी पोलिसांनी आज, आरोपी विनोद शिवकुमार याला दिवाणी न्यायालयाचे प्रथम क्षेणी न्यायाधीश एम. एस. गाडे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात सक्षम व सबळ पुरावे गोळा करण्यासाठी मेळघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे यांनी सरकारी वकिलामार्फत बाजू मांडून आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती. तर आरोपीकडून अॅड. सुशील मिश्रा व अॅड. संदीप सिंह ठाकूर यांनी युक्तीवाद केला. न्यायाधीश एम. एस. गाडे यानी बचाव पक्षाचा युक्तीवाद फेटाळून आरोपी विनोद शिवकुमार याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

महिलांचा रोष

आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला धारणी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी येथील स्थानिक महिलांनी त्याच्याविरोधात रोष व्यक्त केला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. त्यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here