केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात उपोषण केल्यानंतर नाना पटोले हे भिवंडी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेले होते. भिवंडी येथील कार्यक्रम आटोपून शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत परतले. परळ येथून जात असताना लंडन वाईन शॉपच्या इमारतीला भीषण आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून आगीच्या ठिकाणाकडे धाव घेतली. त्यांनी स्वतः पोलीस आणि फायर ब्रिगेड, पोलीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाला फोन करून आगीच्या घटनेची माहिती दिली. तसेच आग लागलेल्या व आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना जागे करून बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ही संपूर्ण आग आटोक्यात येईपर्यंत पटोले स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
ड्रीम्स मॉल आग प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये आग लागून रुग्णालयातील ११ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी मॉल आणि रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये मॉलचे संचालक राकेशकुमार कुलदीपसिंग वाधवान, निकिता अमितसिंग त्रेहान, सारंग राकेश वाधवान आणि दीपक शिर्के यांच्यासह व्यवस्थापनातील इतर व्यक्ती, तसेच प्रिव्हिलेज हेल्थ केअर सर्व्हिसेस आणि सनराईज हॉस्पिटलचे संचालक अमितसिंग त्रेहान, स्विटी जैन आणि व्यवस्थापनातील इतर व्यक्तींचा समावेश आहे.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times