फडणवीस यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्या महाविकास आघाडी सरकारला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी करोनाच्या दुसर्या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली,’ असा टोला फडणवीस यांनी हाणला आहे.
वाचा:
‘गेल्या १० दिवसांपासून राज्यात दररोज सरासरी १ लाख २६ हजार ९५० चाचण्याच होत आहेत. आता तरी हे सूत्र कायम ठेवा,’ असा सल्ला फडणवीस यांनी सरकारला दिला आहे. ‘येणार्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीन लाखांच्या जवळ गेली आहे. शुक्रवार पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या २ लाख ८२ हजार ४५१ रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक ५२ हजार ३४० रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर नागपूर जिल्ह्यात हा आकडा ३८ हजार ३४८, मुंबई पालिका क्षेत्रात ३६ हजार ४०४ तर ठाणे जिल्ह्यात २७ हजार ४७४ इतका आहे. नाशिकमध्येही आकडे वेगाने वाढत असून अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आज २० हजारपार गेली आहे.
लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा पार
मुंबईत करोना लसीकरणाच्या संख्येचा १० लाखांचा टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. आतापर्यंत एकूण १० लाख ८ हजार ३२३ लोकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ७० टक्क्यांहून अधिक लसीकरण महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर करण्यात आलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times