महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक सूचना मुंबईकरांना केल्या आहेत. अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. मुंबईकरांनी करोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, एका बिल्डींगमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळले तर ती सोसायटी सील केली जाणार आहे, अशी माहितीही पेडणेकर यांनी दिली आहे.
मुंबईत रुग्ण दुपट्टीचा कालावधी वाढला आहे. चाळ व झोपडपट्टीतील परिसरात रुग्णांची संख्या वाढत आहे. तसंच, उच्चभ्रु वस्तीतही रुग्ण आढळत आहे. त्यामुळं पाचपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यास रहिवासी सोसायटी सील केली जाणार आहे. तसंच, नाइट कर्फ्यूच्या दरम्यान हॉटेल्स व पब बंद राहणार आहेत. व फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.
तसंच, रविवारी मुंबईत १० किंवा ११ पर्यंत नाइट कर्फ्यू सुरु होण्याची शक्यता आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times