परभणी: करोना रुग्णांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. त्यामुळं या रुग्णांना नातेवाईंकापासून दूर राहावं लागत आहे. घरातील शुभकार्यातही सहभागी होता येत नाहीय. तसंच, वाढदिवसही घरच्यांपासून लांब राहून साजरा करावा लागतोय. मात्र, परभणीतील एका करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा वाढदिवस क्वारंटाइन सेंटरमध्ये साजरा करण्यात आला आहे.

परभणीच्या जिंतूरमध्ये एका पोझिटिव्ह रुग्णाचा करण्यात आला, ते ही कॉरन्टाईन सेंटरमध्ये. एस.बी.देशपांडे असं या रुग्णाचं नाव आहे. जिंतूरातील एका क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ते करोनाचा उपचार घेत असून त्यांचा आज वाढदिवस होता. सकाळपासून देशपांडे यांचा फोन सारखा वाजत होता आणि ते कॉल घेऊन धन्यवाद म्हणायचे. साधारण अर्धा तास हा प्रकार सुरु होता. त्यांच्यासोबत कॉरन्टाईन असेलेल्या इतर रुग्णांनी देशपांडे यांना विचारल्यावर त्यांनी आज वाढदिवस असल्याचं म्हटले. तसंच, माझ्या मुलीची ईच्छा होती हा वाढदिवस खुप मोठा केक आणुन साजरा करायची. पण या करोनामुळे मला घरी जाता येत नाही, असं ते म्हणाले.

देशपांडे यांचा नाराज चेहरा बघता क्वारंटाइन असलेल्या रुग्णांनी ठरवल त्यांचा वाढदिवस साजरा करायचा. पण केक न कापता फळ कापुन साजरा करायचा आणि तयारी चालु केली, योगायोगाने एका मित्राचा फोन आला काही पाहीजे असेल तर सांगा, लगेच खरबुज पाठवा अस सहकाऱ्यांनी सांगितलं आणि केकची चिंता मिटली. सर्व करोना रुग्णांसोबत वाढदिवस साजरा झाला सर्वानी देशपांडे यांचा ५२वा वाढदिवस साजरा केला त्यांना आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या संपूर्ण घटनेचा एका सहकाऱ्याने व्हीडिओ तयार केला आणि क्वॉरंटाईन सेंटरमधल्या वाढदिवसाचा व्हीडिओ पाहता पाहता व्हायरल झाला आहे. माझा असा वाढदिवस घरी देखील साजरा झाला नसता मला हा वाढदिवस सदैव आठवणीत राहील कारण जिंतुरच्या कोव्हिड सेंटरमध्ये खुप छान सुविधा आहेत स्वच्छ परीसर आणि घरच्या सारखी काळजी करणारे डॉक्टर आणि सर्व सहकारी यांचे देशपांडे यांनी आभार मानले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here