नवी दिल्ली: चीनमध्ये करोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारताने या शेजारच्या देशाला मदतीचा हात देऊ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग यांना पत्र लिहून मदतीचा हात पुढे केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात चीनमध्ये करोना व्हायरसमुळे मृत पावलेल्या नागरिकांबाबत शोक व्यक्त केला आहे. त्याशिवाय वुहानमधील ६५० भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चीन सरकारने केलेल्या मदतीसाठीदेखील पंतप्रधान मोदींनी आभार मानले आहेत. करोना व्हायरसच्या संकटाशी मुकाबला करण्यास भारत सरकार चीनला सहकार्य करण्यास तयार असल्याचे यांनी शी जिनपिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सध्या चीनमध्ये करोना व्हायरसमुळे ८११ जणांचा मृत्यू झाला असून ३७ हजार १९८ जणांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती चीन प्रशासनाने दिली आहे. चीनमधील वुहानमध्ये करोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे वृत्त असून सार्वजनिक ठिकाणी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here