मुंबई– छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मागील काही दिवसांमध्ये तिने अभिनेता याच्याबद्दल अनेक खुलासे केले. सुशांतच्या चाहत्यांचा मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास बसलेला दिसत नाहीये. त्यांनी त्या गोष्टीवरून तिला ट्रोलदेखील केलं आहे. अंकिताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काऊचचा मुद्दा उचलून धरत तिला आलेले अनुभव कथन केले होते. यावरून वातावरण बरंच तापलेलं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट केली ज्यात तिने एका व्यक्तीला इशारा देणारं कॅप्शन लिहिलं आहे. पण ही पोस्ट नक्की कोणासाठी होती हे मात्र कळू शकलेलं नाही.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे नाइटीमधील काही फोटो शेअर करत लिहिलं, ‘मी माझं तोंड उघडलंच होतं आणि जवळपास सगळं सांगूनच टाकलं होतं. जवळपास. जर मी ते सगळं बोलले असते तर माझं आयुष्य आता पूर्णपणे बदललं असतं. पण मी तसं केलं नाही.’ अंकिताने शेअर केलेल्या या वाक्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे हे जरी कळू शकलेलं नसलं तरी नेटकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने अंदाज बांधत ही पोस्ट सुशांतसाठी असल्याचा निष्कर्ष काढला.

तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी अंकिताने मुलाखतीत एका बड्या अभिनेत्याने तिचा हात पकडल्याचा उल्लेख केला होता. यावरून ही पोस्ट कदाचित त्याच्यासाठी असू शकते असा कयास लावला. अनेकांनी तिला ट्रोलदेखील केलं. अंकिताने सुशांतमुळे मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्याचं म्हटलं होतं. अंकिताने ‘मणिकर्णिका’ चित्रपटात झलकारीची भूमिका साकारली होती. तर ‘बागी ३’ मध्ये तिने रितेश देशमुख, टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here