मुंबई: महाराष्ट्रात संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. करोना महामारीच्या मोठ्या संकटातून महाराष्ट्र पुन्हा जात आहे. मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे. सध्याच्या वेगानेच लसीकरण सुरु राहिले तर ते पूर्ण होण्यास १२ वर्षे लागतील. लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी लसींचा पुरवठाही त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे. परंतु, देशात व महाराष्ट्रात करोना रुग्ण वाढत असताना हे पाकिस्तान व इतर देशांना लस पाठवत आहेत. करोनाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित असताना ते महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी केला आहे. ( )

वाचा:

प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, केंद्रात काँग्रेस सरकार असताना महामारीचा मुकाबला नियोजनबद्धपणे करण्यात आला होता. बसस्टँडसारख्या सार्वजनिक ठिकाणी लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवल्याने त्यावेळी महामारीवर मात करण्यात यश आले पण सध्या केंद्रातील सरकार तसे करताना दिसत नाही. नागपूरमध्येही करोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. प्रशासनही त्यांचे काम करत आहे. नागपूरच्या आसपासच्या जिल्ह्यांत करोनाचे प्रमाण तुलनेने कमी असताना नागपुरातच करोना रुग्णसंख्या कशी काय वाढू लागली, असा प्रश्न उपस्थित करत पुलवामा स्फोटात वापरले गेलेले आरडीएक्स, अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत सापडलेली स्फोटके आणि नागपूर कनेक्शन तसेच नागपुरात करोना का वाढतोय, या सर्वाचे कनेक्शन काय आहे, अशी विचारणा त्यांनी केली.

वाचा:

रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंग प्रकरणी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षाचे कठपुतली बनू नये, त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करावे. कोणत्यातरी पक्षाला समर्पित होऊन अधिकारी काम करू लागले तर ते लोकशाही तसेच प्रशासकीय व्यवस्थेलाही घातक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परमबीर सिंग व रश्मी शुक्ला प्रकरणी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. भाजप व फडणवीस यांची खोटं बोल पण रेटून बोल, अशी भूमिका राहिली असून सुशांतसिंह राजपूत प्रकरण असो वा परमबीर सिंग प्रकरण असो यातही त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच काम केले आहे, असेही पटोले म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here