श्रद्धाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. ती बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतीच ती एका बोटीतून परत येतानाचा व्हिडीओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे ज्यात काही मुलं श्रद्धावर पाण्याने भरलेले फुगे मारण्यासाठी एकच गोंधळ करतात. त्यात कॅमेरामन देखील मुलांना तसं करण्यापासुन रोखतोय तर श्रद्धादेखील हात जोडत त्यांना विनंती करतेय. जेव्हा श्रद्धा बोटीतून बाहेर पडते तेव्हा तिला पाहून मुलांना प्रचंड आनंद होतो आणि तिच्यावर पाण्याचे फुगे मारण्यासाठी ओरडू लागतात. तेव्हा श्रद्धा त्यांना अत्यंत सुंदर पद्धतीने होळीच्या शुभेच्छा देते आणि जोरात ओरडत ‘नाही’, असं म्हणत फुगे मारू नका म्हणून सांगते.
श्रद्धाने दिलेला हा प्रेमळ नकार पाहून ती मुलंही माघार घेतात. ते श्रद्धाला फुगे मारत नाही आणि श्रद्धा तिथून हसत निघून जाते. श्रद्धाचं तिथलं वागणं चाहत्यांना प्रचंड पसंत पडलं असून तिची प्रतिक्रिया त्यांना क्युट वाटली आहे. चाहते तिच्या वागण्याचं कौतुक करत आहेत. श्रद्धा सध्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून यापूर्वी ती ‘बागी ३’ मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times