यांगून: लोकशाहीची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर म्यानमारच्या लष्करशाहीकडून दडपशाही सुरू आहे. शनिवारीदेखील लष्कराने रक्ताचे पाट वाहिले. म्यानमारच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात ११४ जणांचा मृत्यू झाला. देशातील जवळपास ४४ ठिकाणी लष्कराने गोळीबार केला.

म्यानमारच्या सैन्याने वार्षिक सशस्त्र दल दिनाच्यानिमित्ताने संचलन करत शक्तिप्रदर्शन केले. म्यानमारच्या लष्करशाहीकडून सातत्याने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी झालेल्या गोळीबारात एका १३ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिला ठार करण्यात आले. म्यानमारच्या वृ्त्तमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत २० अल्पवयीन ठार झाले आहेत. मागील महिन्यात झालेल्या सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहेत.

वाचा:

वाचा:

म्यानमारसाठीच्या युरोपीयन महासंघाच्या प्रतिनिधीमंडळाने म्हटले की, म्यानमारचा ७६ वा सशस्त्र बल दिवस हा दहशतीसाठी ओळखला जाईल. लहान मुलांसह निशस्त्र नागरिकांची हत्या या दिवशी करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले. म्यानमारमध्ये आतापर्यंत लष्कराच्या गोळीबारात जवळपास ३२८ हून अधिकजण ठार झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

म्यानमारमध्ये लष्करशाहीकडून सुरू असलेल्या हिंसक कारवाईचे जागतिक पातळीवरही पडसाद उमटले आहे. अमेरिकेसह इतर देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीची मागणी करणाऱ्या जवळपास तीन हजार जणांना अटक करण्यात आली असल्याचा दावा स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. बुधवारी आंदोलनकर्त्यांनी शांततेत बंदचे आव्हान केले होते. या बंदला चांगला प्रतिसाद लाभला. रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here