अभिनेत्री तिलोत्तमा यांनी तापसी पन्नूला टॅग करताना लिहिल, ‘मी तापसीसोबत कधी काम केलं नाही. पण ती खूप मेहनती आहे हे मला माहीत होतं. पण तिच्याकडे माणूसकी किती आहे याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. आपल्या प्लेटलेट्स दान करून तापसीनं खरंच खूप चांगलं काम केलं आहे. त्यासाठी मी तुला शुभेच्छा देते तापसी आणि तुझ्या या कामासाठी तुझं कौतुकही वाटतं.’
तिलोत्तमा यांच्या या ट्वीटवर तापसीनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं लिहिलं, ‘मला हे असं काही करावं अशी नेहमीच इच्छा होती. सर्वांच्या नशीबात हे नसतं. एखाद्याचा जीव वाचवण्याची संधी मला मिळाली हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुमचं माझ्यावरील प्रेम नेहमी असंच बरसत राहो.’
तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर या वर्षात तिच्याकडे बरेच चित्रपट आहेत. सध्या ती आगामी चित्रपट ‘शाबाश मिठ्ठू’ची तयारी करत आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज हिच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय ती ‘रश्मि रॉकेट’ आणि ‘लूप लपेटा’ या चित्रपटांमध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times