मुंबई– अभिनेता अक्षय खन्नाने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीत मोजक्याच चित्रपटात काम केलं. परंतु, त्याने केलेलं प्रत्येक काम प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडलं. प्रेक्षक नेहमीच त्याच्या अभिनयाचं कौतुक करतात. १९९७ सालच्या ‘हिमालय पुत्र’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात करणारा अक्षय आज अनेक उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. आज २८ मार्च रोजी त्याच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अशा चित्रपटांबद्दल जे प्रत्येकाने पाहायलाच हवेत.


दिल चाहता है’ (२००१)
या सिनेमाची कथा तीन जिवलग मित्रांभोवती फिरते जे नुकतेच शिक्षण संपवून बाहेर पडले आहेत. ते जेव्हा प्रेमात पडतात तिथून गोष्टी बिघडण्यास सुरुवात होते. त्यांचे प्रेमाकडे पाहण्याचे दृष्टिकोन भिन्न आहेत. घटस्फोटित मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या अक्षयने सीड नावाची एक शांत आणि सुज्ञ व्यक्तिची भूमिका केली होती. या चित्रपटासाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता.

‘कलम ३७५’ (२०१९)
हा कायद्यावर आधारित चित्रपट आहे ज्यात बॉलिवूड अभिनेत्यावर त्याच्या एका महिला क्रू सदस्याने त्याच्या घरी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ‘कलम ५ ३७५’ जटिल आणि मोहक असूनही प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरला होता. चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं.

‘सीमा’ (१९९७)
ज्येष्ठ चित्रपट निर्माते जे.पी.दत्ता यांचा ह चित्रपट १९७१ च्या लोंगेवालाच्या लढाईवर आधारित असून यात अक्षयसह सनी देओल, सुनील शेट्टी आणि पुनीत इस्सार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वात असलेल्या २३ व्या बटालियन पंजाब रेजिमेंटच्या १२० सैनिकांना या चित्रपटाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. त्यांनी २००० शत्रूंशी झुंज दिली होती. ‘बॉर्डर’ चित्रपटात अक्षयने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासह तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते.

‘मॉम’ (२०१७)
ही थ्रिलर कथा असून त्यात एक आई पार्टीत तिच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा सूड घेते. या चित्रपटात तो एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. चित्रपटातील उत्तम अभिनयाबद्दल अक्षयचं कौतुक झालं होतं.

‘गांधी माय फादर’ (२००७)
या ऐतिहासिक चित्रपटातून मोहनदास करमचंद गांधी (महात्मा गांधी) यांनी आपला मुलगा हरीलाल यांच्याशी असलेले संबंध सांगितले. आपल्या वडिलांनी ठरवलेल्या सर्व तत्त्वांचे पालन करणे, त्यांचा वारसा पुढे नेण्यात अक्षम असलेला मुलगा अक्षयने साकारला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी अक्षयचं प्रचंड कौतुक झालं होतं.

सध्या अक्षय अमिताभ बच्चन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबत त्याच्या पुढच्या ‘आंखें 2’ चित्रपटाच चित्रीकरण करत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here