पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी आणि अखेरची वनडे आज होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसऱ्या लढतीला फायनलचे स्वरुप आले आहे. इंग्लंडने भारताच्या दौऱ्यातील कसोटी, टी-२० मालिका गमावल्यामुळे आता वनडे मालिका जिंकून दौऱ्याची अखेर चांगली करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याउटल भारतीय संघ दौऱ्यावर संपूर्ण वचर्स्व ठेवण्याचा प्रयत्न करेल.

Live अपडेट ( 3rd odi)

>> २० षटकात भारताच्या ३ बाद १२१ धावा

>> इंग्लंडला मिळाली मोठी विकेट, विराट कोहली बोल्ड- भारत ३ बाद १२१

>> केएल राहुलच्या बदली ऋषभ पंत फलंदाजीला आला

>> आदिल रशिदने घेतली आणखी एक विकेट- शिखर धवन ६७ धावांवर बाद, भारत २ बाद ११७

>> भारताला पहिला धक्का- रोहित शर्मा ३७ धावांवर बाद

>> भारताची शानदार सुरूवात- रोहित आणि शिखर यांची शतकी भागिदारी

>> शिखर धवनचे अर्धशतक

>> १० षटकात भारताच्या ६५ धावा

>> रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली भारतीय डावाची सुरूवात

>> दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल

>> भारतीय संघात एक बदल- कुलदीप यादवच्या जागी टी नटराजनचा संघात समावेश

>> भारताच्या विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

>> दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला

>> भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडेचे live अपडेट

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here