तंत्रज्ञानाने सर्वसामान्यांचे जगणे समृध्द केले आहे. आता सण-समारंभाच्या शुभेच्छा समाजमाध्यमावरुन देण्याची प्रथा रुढ होत असतांना राज्यातील मेळघाट भागातील आदिवासी बांधव एकमेकांवर ताशेरे ओढत, शिव्या देत होळीच्या () शुभेच्छ देत साजरा करतात. ( using abusive language for each other)
सलग पाच दिवस उदरनिर्वाहाच्या कामांना कात्री लावून आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. पूर्वापार शिरस्ता व रितींचा यात समावेश असतो.
सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव आज ही परंपरेनुसारच होत असतो. आदिवासी बांधवांच्या या उत्सवाला होळीच्या पूर्वसंध्येपासून सुरुवात होते. रोजगारासाठी भटकंती करणारा आदिवासी बांधव होळीसाठी आपल्या गावी परत येत असतो. पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलिकाचे पूजन केले जाते. एकाच दिवशी सर्व गावात होलिका दहन होत नाही. वेगवेगळ्या दिवशी पेटवली जाते.
पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आदिवासी नृत्य करत असतात. गावाबाहेर मेघनाथाचा स्तंभ उभारल्या जातो. मेघनाथ आदिवासींचे दैवत आहे. त्याची पूजा केली जाते. मोहफुलांपासून काढण्यात आलेले मद्य सर्वांना सेवन करण्यासाठी दिले जाते. किनकी, ढोलकी व बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर तल्लीन होऊन नृत्य करीत असतात. नैसर्गिक रंग खेळण्यात येतात. जेवणामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. होळीनिमित्त मेळघाटातील चारा, कोर या गावामध्ये मोठ्या यात्रा देखील भरत असतात.
क्लिक करा आणि वाचा-
होळीमध्ये आदिवासी गंमतीने एकमेकांवर ताशेरे ओढत असतात. यात वहिनी व दीर, मामा व भाचा यांचा समावेश असतो. नातेसंबंधातून परस्परावर सहज व गंमतीने मात देण्यासाठी गाणे देखील रचले जाते. महिला व पुरुष नृत्याच्या तालावर ताल धरत असतात. या काळात आदिवासी बांधव विविध ठिकाणाहून मेळघाटात परत येत असतात. सातपुडा पर्वत रांगातून तापी नदी वाहत आहे. या नदीला आदिवासी बांधव दैवत मानतात. तिची पूजा करतात. घाटांचा मेळ असणाऱ्या मेळघाटात आदिवासींमध्ये कोरकू, गोंड, राठीया (भिलाला) या प्रमुख जाती अधिक प्रमाणात आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
गडचिरोली व नंदूरबार येथे या जातीचे प्रमाण कमी आहेत. आदिवासींच्या सर्वच जाती पारंपरिकपद्धतीने होळी साजरी करण्यासाठी उत्सुक असतात.
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times