लाहोर: पाकिस्तानच्या वकिलांनी अजब मागणी केली असून सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानच्या वकिलांनी वेटर्सच्या गणवेशावर आक्षेप घेतला आहे. वकिलांसारखा असणारा गणवेश इतरांना न देण्याची मागणी वकिलांनी केली आहे. वकिलांच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
पंजाब बार कौन्सिल, इस्लामाबाद बार कौन्सिल आणि बलुचिस्तान बार कौन्सिलने एक निवदेन जारी केले असल्याचे वृ्त्त पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिले आहे. पाकिस्तानच्या बहुतांशी भागामध्ये वेटर्स काळ्या रंगाचा सूट आणि पांढरा शर्ट घालतात. मात्र, सामान्य नागरिकही लग्न सोहळा, कार्यालय आणि अन्य काही कार्यक्रमांसाठी काळा सूट आणि पांढरा शर्ट घालतात. पाकिस्तानी वकिलांची मागणी मान्य केल्यास काळा सूट, सफेद शर्ट आणि काळ्या रंगाचा टाय वापरण्यास इतरांना मनाई असणार आहे.
तर, एका युजर्सने वकिलांचाच गणवेश बदलण्याची मागणी केली असून त्यांच्या व्यवसायात ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ काही उरले नसल्याचे म्हटले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times