पुणे, : रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. पण यावेळी रिषभ पंतचे शतक होऊ शकले नाही. पण पंतचे शतक पूर्ण झाले नसले तरी पंतने यावेळी वनडेमधील सर्वोत्तम खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले आहे.

पंतने तिसऱ्या सामव्यात पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७८ धावांच दमदार खेळी साकारली. ही पंतची आतापर्यंतची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी ठरली आहे. कारण यापूर्वी पंतने ७७ धावांची खेळी साकारली होती, ही खेळी इंग्लंडविरुद्धच पाहायला मिळाली होती. पंतने या सामन्यात आपलाच विक्रम मोडीत काढला आणि ७८ धावांची खेळी साकारली. पंतची ही खेळी वनडेमधील सर्वोत्तम ठरली आहे. पंत यावेळी दुसऱ्यांदा शतक झळकावू शकला नाही.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात पंत शतक झळकावण्याच्या जवळ पोहोचला होता. पण पंतला यावेळी दुसऱ्यांदा शतकाने हुलकावणी दिल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत वनडे सामन्यांमध्ये पंतला एकही शतक झळकावता आलेले नाही. पण आतापर्यंतच्या १८ वनडे सामन्यांमध्ये पंतने ३३.०६च्या सरासरीने ५२९ धावा केल्या आहेत. आजच्या पंतच्या खेळीने भारताच्या डावाचा चांगला आकार दिला. जेव्हा भारताला धावांची गरज होती तेव्हा पंतने ७८ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. जेव्हा पंत आऊट झाला तेव्हा भारताच्या २५६ धावा झाल्या होत्या. पंतने यावेळी हार्दिक पंड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. त्याचबरोबर पंतने आपले अर्धसतक ४४ चेंडूंमध्ये पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली होती. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या आणि त्यांची ४ बाद १५७ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी पंतने फलंदाजीला आल्यावर धमाकेदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला चांगल्या धावा करता आल्या. पंतला यावेळी हार्दिकची चांगली साथ मिळाली. कारण हार्दिकने यावेळी ६४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताला पंत आणि हार्दिक यांच्या फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता येऊ शकली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here