आज रविवारी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हे भाष्य केले आहे. महाविकास आघाडीचे हे तीन पक्षांचे सरकार आहे. कुणाला मंत्री बनवायचे हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचे हा शरद पवार यांचा अधिकार आहे. आमचे तीन पक्षाचे सरकार आहे हे लक्षात घेऊन या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत याबाबत निर्णय घेतले आहे. त्यामुळे महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे अजित पवार यांनी नाराजीच्या सुरात सांगितले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
नेमके काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरात हे वक्तव्य केले होते. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद हे अपघाताने मिळाले, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी शेवटी अनिल देशमुखांकडे दिले, असे राऊत यांनी म्हटले होते. ते पुढे म्हणला की, या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब असून दहशत देखील आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्रिपदाच्या कारकिर्दिची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीला काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम आहे. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो.
क्लिक करा आणि वाचा-
गृहमंत्र्याने ‘असे’ असायला हवे- राऊत
अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?, असे राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात लिहिले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times