म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

घर घर लंगर सेवा व महापालिकेच्या वतीने हॉटेल नटराज येथे सुरु करण्यात आलेल्या गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांवर फुलांची उधळण करुन होळी साजरी करण्यात आली. करोना रुग्णांचे आत्मबळ वाढविण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. ( was played by at the patients who overcame the )

करोना रुग्णांना माणुसकीच्या भावनेने घर घर लंगर सेवेने आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. घरापासून लांब असलेल्या रुग्णांना होळी सणाचा आनंद मिळाला. होळी सणात करोनाचे संक्रमणाने नव्हे, तर होळीत करोनाचे दहन होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कोविड सेंटरच्या प्रवेशद्वारात करोनाचे प्रतिकात्मक दहनाची होळी पेटविण्यात आली. घर घर लंगर सेवा व महापालिकेच्या वतीने चार मार्च पासून नटराज हॉटेल येथे सर्वांसाठी तर जैन पितळे वसतीगृहात फक्त महिलांसाठी निशुल्क कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
होळी निमित्त तेथे आयोजित या वेगळ्या उपक्रमासाठी महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, किशोर मुनोत, कोविड सेंटरचे डॉ. प्रदीप कळमकर, योगेश तांबे, सुरेखा माळी, आश्‍विनी खरात, कृष्णकांत घोलप उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा-
या उपक्रमाने करोना रुग्णांच्या मनातील भिती निश्‍चित दूर होणार असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले. मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी आवाहन केले की, लक्षणे आढळणार्‍या रुग्णांनी घरी न थांबता कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे. कोणत्याही रुग्णांवर उपचार कमी पडणार नसून याची दक्षता घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here