नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाच्या मारक क्षमता आणि बळकटी होणार आहे. एका महिन्याच्या आत भारतीय हवाई दलात आणखी १० राफेल लाढऊ विमानं दाखल होणार आहेत. यामुळे राफेल विमानांची दुसरी स्क्वॉड्रन तयार करण्याचा मार्ग मोकळा होईल. नवीन विमानं येण्यात हवाई दलात राफेल विमानांची एकूण संख्या २१ वर असेल. हवाई दलात अंबाला तळावरील १७ स्क्वॉड्रन पैकी ११ लढाऊ विमानं आहेत.

आधी ३ आणि पुढच्या महिनाअखेरपर्यंत ७ मिळणार

तीन लढाऊ राफेल विमानं हे येत्या दोन ते तीन दिवसांत फ्रान्सहून उड्डाण घेऊन थेट भारतात दाखल होतील. हवेत मित्र देशाच्या हवाई दलाकडून त्यांना इंधन दिले जाईल. यानंतर पुढील महिन्याच्या मध्यनंतर ७ ते ८ लढाऊ विमानं आणि त्याचं प्रशिक्षण देणारं विमान मिळेल. यामुळे आपली मारक क्षमता वाढेल, असं सरकारमधील सूत्रांनी सांगितलं.

भूतान सीमेजवळ हाशिमारा तळावर तैनात होईल दुसरी स्क्वॉड्रन

फ्रान्सहून ही सगळी विमानं अंबाला वमानतळावर दाखल होतील. यापैकी काही विमानं हाशिमारा तळावर रवाना करण्यात येतील. तिथे राफेल विमानाची दुसरी स्क्वॉड्रन तयार केली जाईल. दुसरी स्क्वॉड्रन तयार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एका स्क्वॉड्रनमध्ये १८ विमानं असतात. हाशिमारा हवाई तळ हा पश्चिम बंगालच्या अलीदपुरद्वार जिल्ह्यात आहे. हा तळ भारत-भूतान सीमेजवळ आहे. भारताने २०१६ मध्ये फ्रान्सकडून ३६ राफेल विमानं खरेदीचा सौदा केला होता. या वर्षी एप्रिल अखेरपर्यंत ५० टक्के विमानं भारताला मिळालेली असतील.

हवाई दलाच्या मोहीमांसाठी हाशिमारा हे सामरिक तळ आहे. कारण इथून भूतान आणि चुंबी खोरे जवळ आहे. चुंबी खोऱ्यात भारत, भूतान आणि चीन या तीन देशांच्या सीमा एकत्र येतात. तसंच डोकलाम याच भागात आहे. जिथे २०१७ मध्ये भारत-चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here