मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि युसुफ पठाणनंतर भारताच्या तिसऱ्या खेळाडूलाही आता करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये करोना पॉझिटीव्ह ठरलेला हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे खेळाडू आता घरी पोहोचल्यावर त्यांना करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या कुटुंबियांसाठीही ही गोष्ट चिंतेची ठरत आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज सध्या सुरु आहे. या स्पर्धेतील भारतीय संघातील सचिन आणि पठाणनंतर आता एस. बद्रीनाथला करोना झाल्याचे पाहिले आहे. आपण करोना पॉझिटीव्ह असल्याचे ट्विट बद्रीनाथने केले आहे. त्याचबरोबर मी आता सर्व सुरक्षेचे नियम पाळत असल्याचेही बद्रीनाथने यावेळी सांगितले आहे.

करोना पॉझिटीव्ह ठरल्यावर बद्रीनाथ म्हणाला की, ” जेव्हा मी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळत होतो, तेव्हा सर्व सुरक्षेचे नियम मी पाळत होतो. त्याचबरोबर नियमितपणे मी करोनाच्या चाचण्याही करत होतो. पण तरीही आता मी करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. करोनाची काही लक्षणे माझ्यामध्ये दिसत आहेत, पण त्यांचे प्रमाण फार कमी आहे. पण तरीही मी सर्व नियमांचे पालन करणार आहे आणि त्याचबरोबर मी आयसोलेशनमध्ये राहणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी सर्व गोष्टी करत आहे.”

सचिन तेंडुलकर करोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर आता या स्पर्धेत खेळलेल्या सर्व खेळाडूंना करोना चाचणी करावी लागणार आहे. कारण हे सर्व खेळाडू रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिनबरोबर खेळत होते. त्यामुळे सचिनला करोना झाल्यावर युसूफ पठाण आणि आता एस. बद्रीनाथ यांनाही करोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघात जे खेळाडू होते, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही यावेळी करोनाची चाचणी करावी लागणार आहे. खेळाडू आपल्या घरी पोहोचल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही यावेळी करोनाची चाचणी करुन घ्यावी लागणार आहे. सचिन तेंडुलकर, युसूफ आणि बद्रीनाथ ज्यांना ज्यांना भेटले होते, त्यांना आता करोनाची चाचणी करावी लागणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here