पुणे, : हार्दिक पंड्याच्या एका चुकीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला पाहायला मिळाला. इंग्लंडच्या सॅम करनने अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना जीवंत ठेवला होता. करनने यावेळी नाबाद ९५ धावांची खेळी साकारली आणि भारताला चांगलीच लढत दिली. पण हार्दिकच्या एका चुकीमुळे हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंच खेळवला गेला.हार्दिक पंड्याची यावेळी नेमकी चुक झाली तरी कोणती, पाहा…

नेमकं घडलं तरी काय…ही गोष्ट घडली ती सामन्याच्या ३४व्या षटकात. यावेळी भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णन गोलंदाजी करत होता. ३४व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही गोष्ट घडलेली पाहायला मिळाली. कारण या चेंडूवर सॅम करनने मोठा फटका खेचला होता. आता नेमकं काय होणार, याची उत्सुकता सर्वांना होती. पण सॅमनने जिथे चेंडू मारला होता तिथे भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या असल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक यावेळी चेंडूच्या दिशेने धावत निघाला होता. हा चेंडू हार्दिकच्या हातामध्येही विसावला होता. पण धावत असताना हातातला चेंडू उडला आणि तो मैदानात खाली पडला. त्यानंतर हार्दिकला चौकारही अडवता आला नाही. हार्दिकने यावेळी सॅमला जीवदान दिल्याचे पाहायला मिळाले. सॅमला जेव्हा जीवदान मिळाले तेव्हा तो २२ धावांवर खेळत होता. या जीवदानाचा चांगलाच फायदा सॅमने उचलला. यावेळी सॅमने फक्त अर्धशतकच साकारले नाही, तर अखेरच्या षटकापर्यंत हा सामना घेऊन गेला.

या सामन्यात हार्दिककडून दोन झेल सुटल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने याच सामन्यात बेन स्टोक्सचाही सोपा झेल सोडल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यातील षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने यावेळी जोरदार फटका मारला. त्यावेळी नेमकं काय होईल, हे कोणालाच कळत नव्हते. पण काही क्षणातच हा चेंडू हार्दिक पंड्याच्या हातात विसावणार आणि भारतीय संघाला मोठे यश मिळणार, असे दिसत होते. कारण यावेळी हार्दिककडे हा सोपा झेल आला होता. त्यामुळे हार्दिक हा झेल पकडेल, असे वाटत होते. पण हार्दिकला यावेळी हा सोपा झेल पकडता आला नाही आणि बेन स्टोक्सला जीवदान मिळाले. त्यावेळी स्टोक्स हा १५ धावांवर खेळत होता. त्यावेळी विराट कोहली हा निराश झालेला दिसला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here