अमरावती: बलात्कारप्रकरणातील आरोपीस जिल्हा न्यायालयात नेले जात असताना शेंदूरजनाघाटात पोलिसांचे वाहन आणि कार बारगावनजीक समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात एकूण १० जण जखमी झाले. या घटनेत ठाणेदार श्रीराम गेडामसह कर्मचारी आणि आरोपी असे पाच, तर कारमधील दोन महिलांसह पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. यातील एका होमगार्डला नागपूर पाठविण्यात आले, तर उर्वरित जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. (the happened when a 10 injured)

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणेदार श्रीराम गेडाम (४९), चालक अतुल मस्की (४१), कर्मचारी चंद्रकांत केंद्रे (४०), होमगार्ड संतोष मरकाम (३५), नकुल सोनटक्के (३४, सर्व रा . शेंदूरजनाघाट) व आरोपी रोशन गंगाराम उईके (२२) अशी पोलीस वाहनातील जखमींची नावे आहेत. शेख फरहान शेख आबिद (१२), सुलताना बानो शेख अख्तर (४०), शमिनाबी बानो शेख बशीर (४६), दानिश खान हाफिज खान (१८), नावेद खान हमीद खान (२४, सर्व रा. पेठपुरा, मोर्शी) अशी कारमधील जखमींची नावे आहेत.

बलात्कार प्रकरणातील आरोपी रोशन गंगाराम उईके याला ११.३० वाजता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यास पोलीस वाहन (एमएच २७ एए ०६२९) ने घेऊन जात होते. बारगावनजीक कार (एमएच ०१ व्हीए ९५०३) ची समोरासमोर जोरदार धडक झाली. पोलीस वाहन रस्त्याच्या कडेला उलटून सरळ झाले. नागरिकांनी जखमींना बाहेर काढले. बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटेसह पोलीस पथक रवाना होऊन सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी होमगार्ड संतोष मरकाम (३५) यांना पुढील उपचाराकरिता नागपूरला आणि ठाणेदार श्रीराम गेडाम यांना अमरावतीला रवाना करण्यात आले, तर आरोपी रोशन उईके याला येथे पाठविण्यात आले. उर्वरित जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकरी कविता फडतरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर, बेनोडाचे ठाणेदार मिलिंद सरकटे, सहायक निरीक्षक हेमंत चौधरी, सुनील पाटील यांच्यासह तिन्ही पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली. घटनेचा तपास बेनोडा पोलीस करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here