म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र पोलिस अकादमीत (एमपीए) प्रशिक्षण घेतलेल्या ११८व्या बॅचचा दीक्षान्त सोहळा येत्या मंगळवारी होणार असून, या कार्यक्रमास मुख्यमंत्री हजेरी लावणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम ऑनलाइनच होणार आहे.

११८ बॅचमधील ६६८ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, दीक्षान्त सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, शनिवारी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांचा सामूहिक डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. शिस्त आणि कायद्याचे प्रशिक्षण देणाऱ्या या ऐतिहासिक संस्थेची यामुळे राज्यभरात बदनामी झाली. या प्रकरणी ‘एमपीए’कडून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात करोनाचा प्रकोप वाढत असून, सरकारकडून लॉकडाउन लावण्याबाबत खल सुरू आहे, तसेच मंत्र्यांच्या दौऱ्यांना ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे एमपीएच्या दीक्षान्त सोहळ्यास मुख्यमंत्री हजर राहणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here