मुंबई: दुबईहून येणाऱ्या एका प्रवाशाकडे २४ लाख रुपयांच्या भारतीय आढळल्या. बनावट नोटाप्रकरणी विमानतळावर जावेद शेख अटक करण्यात आली. पाकिस्तानातून दुबईमार्गे या नकली नोटा भारतात पाठवण्यात आल्या होत्या. बनावट नोटा चलनातून बाद करण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी केली होती.

एक व्यक्ती बनावट नोटांसह दुबईहून येणार असल्याची माहिती केंद्रीय यंत्रणांनांनी मुंबई पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे अन्वेष्ण शाखेच्या पोलिसांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सापळा रचला. टर्मिनल दोनबाहेर असणाऱ्या बस स्टॉपवर एका संशयित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे २३ लाख ८६ हजार रुपये मूल्य असणाऱ्या दोन हजार रुपयांच्या ११९३ नोटा बनावट आढळल्या. जावेदकडे सापडलेल्या दोन हजाराच्या नोटांची छपाई उच्च प्रतीची आणि हुबेहूब असल्याचे पोलिसांनी सांगितले. नकली नोटांमध्ये केवळ तीन त्रुटी असून त्याही क्षुल्लक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपी जावेद हा कळवा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या नकली नोटा पाकिस्तानातून आणण्यात आल्यामुळे यामागे दहशतवादी कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. भारतापासून दुबई ते पाकिस्तान अशी मोठी साखळी यामध्ये सक्रिय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here