मुंबई: ‘महाराष्ट्राला खूप काम आहे. महाराष्ट्राच्या तंगड्यात तंगडं अडकवण्याचं काम करू नका आणि ऊठसूट आरोपांचे रंग उधळू नका,’ असा खोचक संदेश शिवसेना खासदार यांनी आजच्या रंगपंचमीच्या निमित्तानं राज्यातील विरोधी पक्ष भाजपला दिला. ( Message To Opposition)

पोलीस खात्यातील बदल्यांचे रॅकेट व सचिन वाझे प्रकरणी विरोधी पक्षनेते यांनी केंद्रीय गृहसचिवांना पुरावे दिले आहेत. वाझेचे खरे मालक चिंतेत आहेत, असं वक्तव्य फडणवीसांनी दिल्ली भेटीनंतर केलं होतं. त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. ‘विरोधी पक्षनेते अशा प्रकारचे आरोप, टीका-टिप्पणी करत असतात. पण आपल्या विरोधी पक्षनेत्यांना महाराष्ट्रात काही दिसत नाही. त्यांना फक्त दिल्ली दिसते. गृहमंत्री, गृहसचिव आणि पंतप्रधान दिसतात. पण महाराष्ट्रातलं सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे. भलेही ते तीन पक्षांचं असेल. त्यामुळं इथं काय निर्णय घ्यायचा? काय भूमिका घ्यायची? हे इथल्या सरकारला चांगलं माहीत आहे,’ असं राऊत म्हणाले.

वाचा:

होळीच्या निमित्तानं विरोधकांना काय संदेश द्याल असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, ‘विरोधक हे बेरंग आहेत. त्यांना कोणताच रंग नाही. त्यांना रंग असता तर त्यांनी चांगले रंग उधळले असते. त्यांनी आमच्यासोबत प्रेमाची होळी खेळावी एवढंच त्यांना आमचं सांगणं आहे. महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या तंगड्यात तंगडं अडकवू नका. त्यातून काहीही साध्य होणार नाही. सरकार पडणार नाही.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here