मुंबई: मुंबई पोलिसांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त आले. मॅरेथॉनमध्ये धावत असताना अचानक ते कोसळले. त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने यंदा प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. पोलिसांसह सुमारे १६ हजार स्पर्धक सहभागी झाले. मोटार परिवहन विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अतुल पाटीलही मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले. मॅरेथॉनमध्ये धावत असताना त्यांना चक्कर आल्याने ते कोसळले. त्यांना त्यावेळी तातडीने जसलोक रुग्णालयात नेण्यात आले.

या ठिकाणी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर संध्याकाळी त्यांना बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नजीकच्या व्यक्तींनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here