सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या सोफिया हयातनं भारतात होळी सेलिब्रेशनच्या वेळी एका अनोळखी व्यक्तीनं कशाप्रकारे तिच्यासोबत गैरवर्तन केलं होतं हे सांगितलं. सोफिया म्हणली, ‘मी एका होळी पार्टीला गेले होते. ज्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा सहभागी झाले होते. या ठिकाणी माझे अनेक लोक होते ज्यांना माझ्यासोबत फोटो काढायचे होते. जेव्हा मी माझ्या चाहत्यांसोबत असते. तेव्हा स्वतःबद्दल जागरुक असते. पण ही होळी पार्टी असल्यानं मी थोडी बिनधास्त होते.’
सोफिया पुढे म्हणाली, ‘मी या पार्टीमध्ये पाणीपुरी खाल्ली होती आणि त्यात भांग मिसळली होती हे मला माहीत नव्हतं. त्या नशेत मी धुंद झाले होते. माझा गार्ड सुद्धा नशेत होता. मी सर्वासोबत फोटो क्लिक करत होते. अशात एका पुरुषानं माझा स्कर्ट वरच्या बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मला वाटलं, असं काही होऊ शकत नाही मला भास झाला असेल पण त्या व्यक्तीनं पुन्हा तसंच केलं. त्यानंतर मी त्याला धक्का देत बाजूला केलं नशेत असल्यानं तो तोल जाऊन खाली पडला.’
या वेळी तिथे असलेल्या एका पत्रकारानं सोफियाची मदत केली होती. ती म्हणाली, त्या पार्टीमध्ये पत्रकार सुद्धा उपस्थित होते. माझा एक पत्रकार मित्र माझ्याजवळ आला आण मला म्हणाला मी तुला ड्रायव्हरकडे सोडतो. कारण त्यावेळी तिथले सर्वच लोक नशेत होते. त्यानं मला माझ्या कार पर्यंत सोडलं आणि माझ्या ड्रायव्हरनं मला घरी सोडलं. त्यामुळे मला वाटतं असे सण साजरे करताना महिलांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times