अहमदनगर: गेल्या वेळी लोकांच्या मनात करोनाची भीती होती. यावेळी तशी भीती राहिलेली नाही. लोक बिनधास्त फिरत असल्याने संसर्ग वाढतो आहे. तर केंद्र सरकार लसीकरणासाठी विविध बंधने घालीत आहे. अशी बंधने नकोत, लसीकरण सर्वांसाठी खुले करा. येईल त्याला टचाटच लस टोचा. नंतर जे राहतील त्यांनाही शोधून लस द्या, अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करीत असल्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालक मंत्री यांनी सांगितले. लॉकडाउसंबंधी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी त्याची आताच चिंता करू नये, असा टोलाही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हाणला. ()

नगर जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुश्रीफ नगरला आले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासमवेत त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की, ‘तज्ज्ञांनी वर्तविलेल्या दुसऱ्या लाटेतील संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. योग्य ते उपाय करण्यात येत असल्याने लॉकडाऊनची सध्या तरी गरज वाटत नाही.’

वाचा:

राज्यातील स्थितीतबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘यावेळी एक दिसून येते ते म्हणजे लोकांच्या मनात करोनाची भीती राहिलेली नाही. पूर्वी एक जरी रुग्ण सापडला तरी लोक घाबरत होते. घरी आणि अंत्यसंस्काराला जात नव्हते. आता लोक बिनधास्त फिरत आहेत. तोच खरा धोका आहे. आम्ही नियम करत आहोत, काळजी घेण्याचे आवाहन करीत आहोत. मात्र, लोक प्रतिसाद देत नाहीत. पुढील शंभर दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. करोनाची ही दुसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असल्याने काळजी घेण्याची गरज आहे.’

वाचा:

लसीकरणासंबंधी ते म्हणाले, लसीकरण करण्यात आपण आघाडी घेतली आहे. मात्र, यावरील बंधने केंद्र सरकारने उठविली पाहिजेत. अन्य देशांना लस देण्याआधी आपल्याकडे ती खुली केली पाहिजे. अमेरिकेत असेच मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. त्यामुळे तेथील लोक आता विनामास्क फिरू शकत आहेत. आपल्याकडेही वयाचे बंधन काढून टाकले पाहिजे. लस सरकारी दवाखाण्यात आणि बाजारातही उपलब्ध करून दिली पाहिजे. ज्यांना शक्य आहे, ते विकत घेतील. ज्यांना शक्य नाही, ते सरकारी दवाखान्यातून घेतील. मात्र, आता हयगय करता कामा नये. येतील त्यांना टचाटच लस टोचली पाहिजे. नंतर राहिलेल्यांचा शोध धेऊन त्यांनाही लस देता येईल.’

वाचा:

राष्ट्रवादीच्या आमदाराने बाधित रुग्णांसोबत विना मास्क सेल्फी काढल्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, हे चुकीचे आहे. लोकप्रतिनिधींनी असे कृत्य करता कामा नये. त्यातून लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. सध्या लॉकडाऊनसंबंधी काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्याला आताच विरोध करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमच्याच जिल्ह्यातील आहेत, त्यांना आम्ही समजावून सांगू, असा टोलाही त्यांनी लगावला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here