म.टा. प्रतिनिधी,

शेतात झाडाखाली अभ्याला गेलेली मुलगी अचानक शेततळ्यात पडल्याचे पाहून तिचे वडील मदतीला धावले. मात्र, त्यांनाही पोहता येत नव्हते. त्यात शेततळ्याच्या निसरड्या कागदामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील वीरगाव येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. ( in in )

वीरगाव येथे अश्विनी कृष्णांगर थोरात (वय १६) ही मुलगी अभ्यास करण्यासाठी शेतात गेली होती. तेथे झाडाखाली बसून ती अभ्यास करीत होती. उष्णतेचा त्रास होत असल्याने ती तळ्याकडे गेली असावी. शेततळ्यातून तिचा आवाज येऊ लागल्याने शेतात काम करणाऱ्या तिच्या आई-वडिलांनी तिकडे धाव घेतली. वडिल कृष्णांगर जगन्नाथ थोरात (वय ४५) यांनाही चांगले पोहता येत नव्हते. तरीही मुलगी तळ्यात पडल्याचे पाहून त्यांनीही तळ्यात उडी घेतली. मुलीने पित्याच्या गळ्याला मिठी मारल्याने दोघेही बुडू लागले.

काठावरून हे पहात असल्याने मुलीच्या आईने आरडाओरड केली. आवाज ऐकून जवळचे लोक मदतीला धावले. मात्र, त्यातील अनेकांना पोहता येत नव्हते. आणखी काही लोकांना बोलविण्यात आले. त्यांना तळ्यातून बाहेर काढण्यासाठी दोरखंड आणि अन्य साहित्याची जमवाजमव करण्यात आली. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. लोकांनी तळ्यात उतरून दोघांनाही बाहेर काढले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाला होता.

क्लिक करा आणि वाचा-
दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सणासुदीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. मुलगी तळ्याकडे का गेली आणि कशी पडली, हे मात्र नेमकेपणाने स्पष्ट होऊ शकलेले नाही.

क्लिक करा आणि वाचा-
करोनामुळे शाळा बंद असल्याने मुले अभ्याससाठी आणि अन्य कारणांसाठी शेतावर जात आहेत. मुळातच निसरडा कागद असलेली आणि बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग नसलेली शेततळी धोकादायक आहेत. शेतावर गेलेली विद्यार्थी शेततळ्यात, कालव्यात, नदीच्या डोहात बुडून मरण पावण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. आता उन्हाळ्यात या घटना आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here