मुंबई: ज्या नवोदित गायक-गायिकांच्या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले, ज्यांच्या निरागस सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली, ज्यांनी विविध शैलींची गाणी अत्यंत सहजतेने सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मन जिंकली. त्या ”च्या गुणी गायकांची अंतिम फेरी नुकतीच मुंबईत रंगली होती. स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात डोंबिवलीच्या अक्षया अय्यर हिने विजेतेपदावर मोहोर उमटवली.
आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने अक्षयाने सर्वांना भारावून टाकले. सुवर्ण कट्यार आणि दोन लाख रुपयांची ती मानकरी ठरली असून सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या हस्ते हा पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times