मुंबई: भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार आणि माजी मुख्यमंत्री (Narayan Rane) यांनी सचिन वाझे प्रकरणावरून (Sachin Vaze Case) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र, हा निशाणा साधत असताना त्यांनी संजय राऊत यांच्याच ‘रोखठोक’ या सदरातील लेखाचा आधार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेबद्दल असे काय प्रेम आहे? मुख्यमंत्र्यांना सचिन वाझे यांच्या पार्श्वभूमीची माहिती कशी नाही?, सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?, असे एकावर एक सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्यावर निशणा साधला आहे. ( criticized the over the )

अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा शरद पवारांनी हे पद अनिल देशमुखांकडे दिले, असे संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?, असा सवाल देखील राऊतांनी लेखात उपस्थित केला आहे. राऊत यांच्या या वाक्यांवरून राणेंनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्याच चुका दाखवल्या- राणे

राज्यात गेल्या सव्वा वर्षापासून राजकीय धुळवड सुरू असल्याचे सांगत सामनाच्या लेखातून संजय राऊतांनी पहिल्यांदाच सरकारच्या चुका दाखवून दिल्या आहेत, असे राणे यांनी म्हटले आहे. सचिन वाझेला वाढवलं, त्याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागत आहेत, असा टोलाही राणे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. संजय राऊतांचा लेख म्हणजे लेकी बोले, सुने लागे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चुका नाव न घेता दाखवून दिल्या आहेत, असेही राणे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडत असताना राणे यांनी प्रश्नावर प्रश्न उपस्थित केले आहेत. परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या का? सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या केल्यानंतर देखील त्याला अटक करू देत नव्हते. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याबद्दल असं काय प्रेम आहे? मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेच्या बॅकग्राऊंडचीही माहिती कशी नाही? सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?, असे सवाल राणे यांनी उपस्थित केले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here