अक्षयकुमारच्या जो फोटो पोस्ट केला आहे, त्यात त्याचा पेहेराव जादुगाराचा आहे. हा फोटो पोस्ट करताना अक्षय लिहितो, ‘आज अतरंगी सिनेमाचा शेवटचा दिवस आहे. आनंद एल. राय यांच्या या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहे. या सिनेमात माझ्यासोबत आणि सारा असून त्यांनाही माझ्या खूप सा-या शुभेच्छा…’ या शिवाय अक्षयने या सिनेमाची पटकथा लिहिणारे लेख हिमांशु शर्मा आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचे ही आभार मानत त्यांना टॅग केले आहे.
अक्षय आणि धनुष पहिल्यांदा एकत्र
या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे दाक्षिणात्या सिनेमातील आघाडीचा अभिनेता धनुष आणि अक्षय कुमार पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयकुमारची भूमिका दिग्दर्श आनंद राय यांनी हृतिक रोशनला दिली होती. परंतु त्याने या सिनेमात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर आनंद यांनी ही भूमिका अक्षय कुमारला दिली. या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सारा देखील या सिनेमासाठी कमालीची उत्सुक आहे.
चाहत्यांना देखील सिनेमाची उत्सुकता
अक्षय, सारा आणि धनुष यांच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे. अक्षय याने या,सिनेमासंबंधी पोस्ट टाकल्यानंतर अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक चाहता म्हणतो ,’हा असा पहिला सिनेमा आहे की ज्यात माझे आवडीचे दोन कलाकार एकत्र काम करणार आहेत. मला हा सिनेमा पाहण्याची खूप उत्सुकता असून लोकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल, याची मला खात्री आहे. ‘ तर दुस-या एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘ या सिनेमात साराची भूमिका नेमकी कशी आहे याची उत्सुकता आहे.’ तर आणखी एक चाहता लिहितो की अक्षयला कोणतीही भूमिका शोभून दिसेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times