म. टा. प्रतिनिधी ,कोल्हापूर

रस्त्याकडेला रात्रीचा डाव मांडत दारू पीत बसलेल्या पोलिसांना अधिकाऱ्याने हटकले,याचा राग येताच पोलिसांनी चक्क अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्याचा प्रकार कोल्हापुरात घडला. याबाबत दोन पोलिसावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यानिमित्ताने कोल्हापुरातील ओपन बारचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. ( pushed their own officer in )

याबाबत अधिक माहिती अशी, कसबा बावडा येथे एका रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेवर दोन पोलीस व काही सहकारी दारू पीत बसले होते. रात्रीची गस्त घालण्यासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्याला ही ओपन बार पार्टी दिसली. पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व दोन पोलीस गस्त घालत होते. त्यांनी त्या पोलिसांना हटकले. पोलीस उपअधीक्षक चव्हाण यांचा अंगरक्षक असलेल्या प्रवीण शिंदे याच्या बरोबर तेथे दारू पिण्यास बसलेल्या पोलिसांचा आवाज वाद झाला. या वादात त्यांनी प्रवीण शिंदे बरोबरच पोलीस अधिकारी चव्हाण यांनाही शिवीगाळ केली. वाद वाढत गेला, प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले.

क्लिक करा आणि वाचा-
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्या पोलिसांना आपण काय करतोय हेच लक्षात येईना. त्यांनी थेट आपल्या अधिकाऱ्यांवरच हात उगारला आणि पोलिसांच्यात रस्त्यावरच हातघाई सुरू झाली. रात्री घडलेल्या या घटनेची माहिती पोलीस उपअधीक्षक चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिली. त्यानंतर बलकवडे यांनी संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार प्रवीण शिंदे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

क्लिक करा आणि वाचा-
बळवंत शामराव पाटील, राजकुमार शंकर साळुंखे, आणि जितेंद्र अशोक देसाई या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. यानिमित्ताने कोल्हापुरात राजरोसपणे सुरू असलेल्या ओपन बारचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. याशिवाय पोलीस थेट अधिकाऱ्यावर हात उगारू लागल्याची घटना घडल्याने पोलिसांतील दांडगाई यानिमित्ताने समोर आली आहे. या घटनेची कोल्हापुरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारवाई करण्यात आलेले पोलीस हे महामार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here