नांदेड: नांदेडमध्ये दरवर्षी धुलिवंदनानिमित्त हल्ला मोहल्ला हा सण साजरा केला जातो. पण यंदा वाढत्या कोरोनामुळे शीख बांधवांचा हल्ला मोहल्ला कार्यक्रम प्रशासनाने रद्द केला होता. याला गुरुद्वारा समितीनेही सहमती दर्शवली होती. मात्र, काही उत्साही तरुणांनी प्रशासनाचे आदेश धुडकावत सायंकाळी पोलिसांनी सुरक्षेसाठी लावलेली बॅरिकेंटींग तोडत कार्यक्रम केला. (nanded 4 police personnel injured in allegedly attack of some sikh youths in nanded)

यावेळी जमावाने पोलिसांवर तलवारीने कथित हल्ला चढवला आणि पोलिसांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली. जखमींमध्ये पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांचा अंगरक्षक दिनेश पांडे सह पाच पोलिस गंभीर जखमी झालेत. घटनास्थळावर जमाव जास्त आणि पोलिस कमी अशी परिस्थिती होती. जमावाने पोलिस अधिक्षक, अतिरिक्त पोलिस अधिक्षकाच्या गाड्यांसह दगडफेक करून गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झालाय. यावेळी गुरुद्वाराचे मुख्य बाबांनी अवाहन करुनही उत्साही तरुणांनी हल्ला मोहल्ला कार्यक्रम केला.

क्लिक करा आणि वाचा-
जमावाने खाजगी वाहनांचीही प्रचंड नासधुस केलीय. दरम्यान या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही. संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा-
प्रमोदकुमार शेवाळे यांनी अधिक माहिती देताना पुढे सांगितले की, करोना प्रादुर्भाव वाढत चालल्याने कोविडबाबत गाइडलाइन्स आणि जिल्हा प्रशासनाने नांदेडमध्ये लॉकडाउन जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर हल्लाबोल या धार्मिक कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. गुरुद्वारा मंडळाचे सदस्य आणि धार्मिक गुरूंची बैठकही घेतली गेली होती. यानंतर पारंपरिक मार्गाने न करता प्रतिकात्म करायचे ठरवले होते. मात्र तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत होते. त्यांनी धर्मगुरुंच्या सूचनांचा अवमान केला आणि त्यांनी गेट क्रमांक १ मधून बाहेर पडून पारंपरिक पद्धतीने हल्लाबोल कार्यक्रम केला. यात पोलिस दलातील ४ कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच ७ ते ८ वाहनांचे नुकसानही झालेले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here