औरंगाबाद: औरंगाबादेतील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ३० तारखेच्या मध्यरात्रीपासून ते ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी आता त्यात काहीसा बदल करण्यात आला आहे. आता हा लॉकडाऊन ३० ऐवजी ३१ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान असणार आहे. यात पेट्रोलपंप आणि हॉटेल्ससाठी जारी करण्यात आली आहे. (some changes has been made in the lockdown of )

जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार लॉकडाऊनच्या काळात सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर नागरिकांसाठी पेट्रोल उपलब्ध असणार आहे. या बरोबरच हॉटेलमध्येही रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरीसाठी मुभा असणार आहे. तसेच दुपारी १२ वाजल्यांनंतर नंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इंधन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना आपले ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. शहरात होम आयसोलेशनची संख्या मोठी असल्याने हॉटेल्सना रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी देण्याची सूट देण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
विशेष म्हणजे या लॉकडाऊनमधून उद्योग क्षेत्र वगळण्यात आले आहे. सर्व उद्योग आणि त्याचे पुरवठादार नियमानुसार काम करणार आहेत. औद्योगिक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरू राहणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-
त्याचबरोबर वृत्तपत्रांचे वितरण सुरू राहणार आहे. वृत्तपत्रांबरोबरच नियतकालिकांची छपाई आणि वितरणही सुरू ठेणण्यात आले आहे. डिजिटल आणि प्रिंट मीडिया यांच्या कार्यालयांमध्येही शासकीय नियमानुसार काम सुरू राहणार आहे. दरम्यान, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने या कंपन्यांना दिल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
लॉकडाऊन दरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिस ठिकठिकाणी गस्त देखील घालणार आहेत. शिवाय काही चौकांमध्ये पोलिसांचा पहारा ठेवण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here