पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पुण्यातील रुग्णालयांमध्ये आता बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता खासगी रुग्णालयात तब्बल ८० टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही महत्वाची माहिती दिली आहे. (80 percent of are reserved for )

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स कोविडसाठी राखीव !… कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील ८० टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. ३१ मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होतील’.

पुण्यात फक्त ४९० शिल्लक

पुणे शहरात एकूण ५ हजार ८ बेड उपलब्ध आहेत. त्यातील फक्त ४९० बेड शिल्लक आहेत. त्यात साध्या खाटांची संख्या २४३ इतकी असून ऑक्सिजन बेडची संथ्या २१७ इतकी आहे. तर, आयसीयू बेड २० आणि व्हेंटिलेटर बेड १० आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरात २ हजार ६८२ बेड कमी पडत आहेत. म्हणूनच शहरातील खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यात आजा २,५४७ नव्या रुग्णांचे निदान

दरम्यान, पुणे शहरात आज नव्याने २ हजार ५४७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ६१ हजार ६५९ इतकी झाली आहे, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
शहरातील २ हजार ७७१ कोरोनाबाधितांना आज घरी सोडण्यात आले असून पुणे शहरातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख २३ हजार ५४१ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात १५ हजार १५३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण चाचण्यांची संख्या आता १४ लाख ४९ हजार १५१ इतकी झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here