रामदास कदम यांना करोनाची लक्षणे दिसल्यानंतर केलेल्या चाचणीत ते पॉझिटीव्ह आढळले. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.
कदम यांनी काही दिवसांपूर्वीच करोना प्रतिबंधक लस घेतली होती. त्यावेळी त्यांनी जनतेला करोना लशीबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी एक ट्विट देखील केले होते. कोरोना प्रतिबंधक लस घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु हे लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे.
क्लिक करा आणि वाचा-
लसीकरणानंतरही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुवणे या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहनही कदम यांनी लोकांना केले होते.
आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेनाही झाली करोनाची लागण
काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांना देखील करोनाची लागण झाली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी होम क्वारटाइन करण्यात आले होते. तेथेच त्यांच्याव उपचार देखील सुरू करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
करोनाचा लागण होण्यापूर्वी रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत मुंबईतील जेजे रुग्णालयात करोना प्रतिबंधक लस घेतली होती.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times