वाचा:
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत चाचण्यांच्या संख्येत सोमवारी थोडी घट झाली. परिणामी, बाधितांची संख्याही घटल्याचे आकडेवारीतून दिसून आले. शहरात १५ हजार १५३ एवढ्या चाचण्या झाल्या असून, आतापर्यंत एकूण १४ लाख ४९ हजार १५१ चाचण्या झाल्या आहेत. शहरात ६७४ गंभीर रुग्ण असून, २८८० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. एका दिवसात २७७१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख २३ हजार ५४१ झाली आहे
वाचा:
गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंतची मृतांची संख्या ५२४३ इतकी झाली आहे. शहराबाहेरील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात ३२ हजार ८७५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी २८ हजार ५३२ रुग्ण गृह विलगीकरणात, तर ४३४३ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. एकूण जिल्ह्यामध्ये ४५ हजार ४९ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी १३ हजार ९५४ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मध्ये १४७२ आणि मध्ये ९४२ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सोमवारी करोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या नऊ हजार ८७३ इतकी झाली आहे.
वाचा:
पुण्यातील सोमवारची स्थिती
पुण्यातील नवीन रुग्ण : २५४७
बरे झालेले रुग्ण : २७७१
गंभीर रुग्णांची संख्या : ६७४
दिवसभरात मृत्यू : २४ (८ शहराबाहेरील)
पिंपरी चिंचवड मधील स्थिती
नवीन रुग्ण : १,४७२
बरे झालेले रुग्ण : ९४१
गंभीर रुग्ण : ८५
दिवसभरात मृत्यू : ६ (२ शहराबाहेरील)
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times