वाचा:
एसटी कर्मचाऱ्यंनी लॉकडाऊन कालावधीत आपल्या आरोग्याची पर्वा न करता कर्तव्य बजावले आहे. परराज्यातील लोकांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचे काम केले आहे. शिवाय चालक-वाहक वर्गाचा रोज शेकडो प्रवाशांशी संपर्क होत असल्याने इतर वर्गाप्रमाणे सरसकट सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कोविड १९ ची लस देण्यात यावी अशी, मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी सतेज पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली.
वाचा:
पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला. एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट कोविड १९ ची लस देणे आवश्यक असून त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेन असे आश्वासन दिलेच शिवाय तातडीने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व शासकीय आरोग्य विभाग यांना फोन करून कार्यवाहीसाठी सूचितही केले. आजच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कार्यवाही केली जाईल, असेही शिष्ठमंडळास आश्वस्त केले. संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये विभागीय अध्यक्ष अनिता पाटील, विजय भोसले, बी. आर. साळोखे, एस. वाय. पवार, बी. डी. शिंदे, अय्याज चौगुले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वाचा:
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनाही करोनाचा विळखा पडला आहे. आतापर्यंत एकूण ४ हजार २८२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून त्यातील १०९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर ४ हजार ४६ कर्मचारी करोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. सध्या १२७ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times