नाशिक: नाशिकमध्ये करोनाचा उद्रेक झाला असून स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तीनच दिवसांपूर्वी पालकमंत्री यांनी नाशिकमध्ये लावण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकायला सुरुवात केली असून बाजारपेठेत जायचे असेल तर आता अनेक कठोर नियमांचे अडथळे आधी पार करावे लागणार आहेत. त्यासोबत व्यापारी आणि फेरीवाल्यांनाही वचक बसावा म्हणून पावले टाकण्यात आली आहेत. ( )

वाचा:

नाशिक शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी महापालिका क्षेत्रात तब्बल २ हजार ४०३ नवीन रुग्णांची भर पडली तर उर्वरित नाशिक जिल्ह्यात १ हजार १५९ नवे रुग्ण आढळले. नाशिक जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढून २६ हजार ५३८ इतकी झाली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी नाशिक शहरात थेट रस्त्यावर उतरून गर्दीच्या ठिकाणांना भेट दिली होती व नियमांचे पालन करण्यासाठी विनंती केली होती. नियम पाळले गेले नाही तर लॉकडऊन हा एकमेव पर्याय उरेल, असे ते म्हणाले होते. नाशिककरांना ८ दिवसांची मुदत देतानाच २ एप्रिल रोजी बैठक घेऊन लॉकडाऊनबाबात निर्णय घेतला जाणार असेही त्यांनी नमूद केले होते. भुजबळ यांच्या या इशाऱ्यानंतर नाशिक महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे शिस्तीचा बडगा उगारला असून त्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे.

वाचा:

गर्दी रोखण्यासाठी कठोर पावले

– वाढत्या करोना संसर्गामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणारे रस्ते केले बंद.
– बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास पाच रुपये प्रतिव्यक्ती आकारले जाणार.
– महापालिका आणि पोलीस संयुक्त कारवाई करणार.
– एक तासापेक्षा जास्त वेळ बाजारपेठेत थांबल्यास पाचशे रुपये दंड.
– नियम मोडल्यास मुंबई पोलीस कायदा ४३ अन्वये कारवाई करणार.
– शालिमार, नवापुरा, बादशाही कॉर्नर येथे पोलिसांची बॅरिकेडिंग. महापालिकेचा प्रत्येक पॉइंटवर टेंट असणार.
– बाजारपेठेतील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना भद्रकाली पोलीस स्टेशनकडून पास दिले जाणार. पासधारकांनाच असेल प्रवेश.
– मेनरोड, सिटी सेंटर मॉल, पंचवटी बाजार समितीमध्ये हा निर्णय लागू.
– सकाळी ८ ते रात्री ८ पोलीस तैनात असणार. ८ नंतर कुणालाही परवानगी नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here