मुंबई: वयाच्या विशीत असताना बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्याच्या पंतप्रधान यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेली राजकीय टीका-टिप्पणी थांबण्याचे नावच घेत नाही. सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेनंही मोदींच्या या वक्तव्यावर उपरोधिक टीका केली आहे. ‘मोदींनी दिलेली ही माहिती ऐकून त्यांचे भक्त नक्कीच थरारून गेले असतील. इंदिरा गांधींनी युद्ध करून पाकिस्तान तोडले व बांगलादेश निर्माण केला, यापेक्षा बांगलादेश निर्मितीसाठी मोदी यांनी सत्याग्रह केला हे शौर्य भाजप कार्यकर्त्यांना वाटू शकते,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे. ( Taunts PM Modi)

वाचा:

मोदींनी नुकताच बांगलादेश दौरा केला. तिथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामाची आठवण काढली. स्वातंत्र्य लढ्यातील स्वत:च्या सहभागाचाही उल्लेख केला. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे. ‘इंदिरा गांधींच्या शौर्यामुळे, पराक्रमामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधी यांनी युद्ध पुकारून पाकिस्तानची सरळ फाळणीच केली. त्यानंतर असं शौर्य कोणत्याही पंतप्रधानांना गाजवता आलं नाही. त्या बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात आपलाही सहभाग होता, असं विधान मोदी यांनी बांगलादेशच्या भूमीवर जाऊन केलं, हे आश्चर्यच आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ‘मोदी सांगतात ते खरेच मानायला हवे, अशी आजची स्थिती आहे. पण पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी इतका खटाटोप करावा लागेल व प्रकरण बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागापर्यंत पोहोचेल असे वाटले नव्हते,’ असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे.

म्हणते…

  • प. बंगालातील पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येस मोदी बांगलादेशातील मंदिरात होते हा योगायोग नक्कीच नाही. तिथं मोदींनी जशोरेश्वरी कालिमाता मंदिरास भेट दिली. एका मुस्लिम देशातील मंदिरात भारतीय पंतप्रधानाने अधिकृतपणे दर्शनासाठी जाणे हे मोदीप्रेमींना नक्कीच रोमांचकारी वाटू शकते. राजकीयदृष्ट्या कमालीचे जागरुक असलेले मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील.

वाचा:

  • ‘बांगलादेशमधील नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने त्यावेळी केलेल्या अत्याचारांची छायाचित्रे पाहून आम्हाला अनेक दिवस झोपही लागली नव्हती,’ असे मोदी यांनी ढाक्यात सांगितलं. मोदी हे कमालीचे हळवे, दयाळू व संवेदनशील असल्याचं हे लक्षण आहे. त्यामुळं गेल्या चार महिन्यांपासून गाझीपूर सीमेवर शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात ऊन, वारा, पावसात रस्त्यावर बसले आहेत. तेथे त्यांचे बळी गेले. अत्याचार सहन करीत हे शेतकरी तेथे बसले आहेत. याचं दुःख आपल्या पंतप्रधानांना होतच नसेल असं कसं म्हणता येईल?
  • मोदी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला व या काळात त्यांना झोप लागत नव्हती हेच सत्य आहे. मोदी विरोधकांना हे पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या डोक्यात साचलेला इतिहास गाळून घ्यावा.
  • देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ‘ताम्रपट’ व पेन्शन मिळते. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात.

वाचा:

  • मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याने प. बंगाल विधानसभा निवडणुकीत मतांचा चढउतार किती होईल हे आजच सांगता येणार नाही, पण मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here