वाचा:
ब्रिजवाडी परिसरातील सहा महिन्याच्या बालिकेला २७ मार्च रोजी घाटीत गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते आणि तिच्यावर सुपरस्पेशालिटी ब्लॉकमध्ये (एसएसबी) उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा सोमवारी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. तसेच शहरातील जुबली पार्क परिसरातील १४ वर्षीय बालरुग्णाला घाटीमध्ये २३ मार्च रोजी घाटीत दाखल केले होते व त्याच्यावर आयसीसीयुमध्ये उपचार सुरू होते. संबंधित बालरुग्ण हा गंभीर व्याधीग्रस्त होता व उपचारादरम्यान त्याचा सोमवारी रात्री दहा वाजता मृत्यू झाला. त्याचवेळी घाटीमध्ये सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून आतापर्यंत १८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
करोना बळींची संख्या १६०८ वर
जिल्ह्यातील करोना बळींची संख्या १६०८ वर गेली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात १२७२ नवे बाधित आढळून आल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या ८०,०२१ झाली आहे. तर, १२०९ जण करोनामुक्त झाल्यानं एकूण करोनामुक्त व्यक्तींची संख्या ६२,७०७ झाली आहे. सध्या १५,७०६ बाधितांवर उपचार सुरू आहेत
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times