कर्जत: कर्जत येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जेलमधून पाच कुख्यात आरोपी जेलचे छत तोडून पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे कर्जतमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पसार झालेल्या या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे.

रविवारी, सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनचे जेलमधील कस्टडी क्रमांक तीन येथे असलेले आरोपी अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत (जामखेड), ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (जामखेड) गंगाधर लक्ष्‍मण जगताप (महाळंगी), मोहन कुंडलीक भोरे हे तुरुंगात होते. या पाच जणांनी जेलच्या छताचे प्लाउड तोडले. त्यानंतर कौले काढून चारही आरोपी पसार झाले. यामधील ज्ञानेश्वर कोल्हेवर रिव्हॉल्वरची बेकायदेशीर विक्री करण्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तर, अक्षय रामदास राऊत, मोहन कुंडलीक भोरे व चंद्रकांत महादेव राऊत हे खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होते. तर गंगाधर जगताप कर्जत तालुक्यातील आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत होता. या सर्व आरोपींना एकाच कस्टडीमध्ये ठेवण्यात आले होते. या चौघांनी तुरुंगाबाहेरील काही साथीदारांच्या मदतीने पळण्याचा कट आखल्याचे समजते.

आरोपी कर्जत येथील जेलमध्ये का ठेवले?
हे चारही आरोपी धोकादायक असताना त्यांना कर्जत येथील जेलमध्ये का ठेवण्यात आले असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चारही आरोपी येरवडा येथील कारागृहामध्ये ठेवण्याची गरज असताना कर्जत पोलिसांनी हा मोठा धोका पत्करला होता त्याची किंमत मोजावी लागली असल्याची चर्चा सुरू आहे.

जेल किती सुरक्षित?
कर्जत येथील असलेले कारागृह अतिशय जुनी असून कौलारू छतं आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून आरोपींनी सहज पलायन केले. या कारागृहाची परिस्थिती पाहता नवीन कारागृह बांधण्याची आवश्यकता असल्याची चर्चा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here