मागील काही महिन्यांपासून आणि चीनमध्ये वाद सुरू आहेत. मागील आठवड्यातच दोन्ही देशांनी एकमेकांवर निर्बंध लादले. ली यांगच्या ट्विटमुळे कॅनडा आणि चीनमधील संबंध आणखी तणावपूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. कॅनडाचे चीनसोबत संबंध खराब होण्यासाठी पंतप्रधान ट्रुडो जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले. चीन आणि कॅनडादरम्यानचे चांगले संबंध तुमच्यामुळे बिघडले असून कॅनडाला अमेरिकेच्या मागे फिरणारा श्वान बनवले असल्याची टीका ली यांग यांनी केली.
वाचा:
वाचा:
वाचा:
कॅनडाचे चीनमधील माजी राजदूत डेव्हिड मुलरोनी यांनी गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ली यांग यांचे वक्तव्य धक्कादायक आहे. ली यांग यांचे ट्विट चीनच्या डिजीटल डिप्लोमसीचे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले. चीनमधील शिनजियांग प्रातांत उइगुर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्यावर कॅनडा आणि चीनमध्ये वाद सुरू आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times