‘युपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. काँग्रेसहा देशव्यापी पक्ष आहे. कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि राहणार आहे. पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील. त्यामुळं अशी कल्पना मांडणं योग्य वाटत नाही असं मला वाटतं,’ असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.
‘युपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवरुन थोरात यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार होण्यात संजय राऊतांचा मोठा सहभाग असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगतो. पण संजय राऊत एका बाजूला राजकारणी आहेत. पण त संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असं वाटून जातं,’ असं थोरात यांनी म्हटलं आहे.
‘आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. आम्ही घटकपक्ष आहोत. त्यामुळं तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचं काम आहे. अशा वक्तव्यामुळं नाराजी होत असते,’ असंही थोरात म्हणाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times