आमदार चव्हाण यांच्यासह सुमारे ४० ते ५० जणांचा जमाव शुक्रवारी महावितरणच्या कार्यालयात गेला होता. यावेळी त्यांनी फारुख यांना दोरीने खुर्चीत बांधुन मारहाण केली. फारुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चव्हाणांसह ३१ जणांना अटक केली हीती. अटकेतील सर्व संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. यामुळे त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती.
वाचा:
सुनावणीअंती न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली. जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे आणखी ३१ जणांना ठेऊन घेणे गैरसोयीचे होणार होते. त्यामुळे आमदार चव्हाण यांच्यासह सर्व ३१ संशयितांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले.न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांतर्फे एकत्र जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times