मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांना पुन्हा आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

शरद पवार यांच्यावर उद्या म्हणजेच बुधवारी एंडोस्कोपी आणि सर्जरी केली जाणार आहे. मात्र, आज त्यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

रविवारी रात्री शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं होतं. त्यासाठी पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसंच, पवारांची दोन औषध बंद करण्यात आली आहेत.

सर्व कार्यक्रम रद्द

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. पण प्रकृती अस्वस्थेमुळं शरद पवारांना रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत. तर लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here