मुंबई: राज्यात दररोज नव्या बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असला तरी देखील आजचा नव्या रुग्णांचा आकडा तुलनेने दिलासा देणार आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २७ हजार ९१८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ३१, हजार ६४३ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ ३ हजार ७२५ ने कमी आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण २३ हजार ८२० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या २० हजार ८५४ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ४० हजार ५४२ वर जाऊन पोहचली आहे. (maharashtra registered 27918 new cases in a day with 23820 patients recovered and 139 deaths today)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here