मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी करोनाबाबत विचार करण्यासाठी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाउनसारखे उपाय न केल्यास राज्यातील मृत्यूचा आकडा वाढू शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात आली होती. राज्यात कोविडबाबतचे नियम आणि मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले असून, ही स्थिती अशीच राहिल्यास प्रशासनाने लॉकडाउन लागू करण्याबाबत तयारी सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. राज्यात रुग्णालयांमधील बेडची तसेच इतर सोयी सुविधांची कमतरता कमी असल्याने कडक निर्बंधांचा विचार करावा लागेल अशी चर्चा बैठकीत करण्यात आलेली होती.
मात्र, जरी यावेळी लॉकडाउन लागू करण्यात आला तरी देखील या वेळचा लॉकडाउन हा मागील लॉकडाउनपेक्षा वेगळा असेल असे समजते. या लॉकडाउनमुळे आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, असेही समजते.
क्लिक करा आणि वाचा-
सरकारने नव्या प्रकारच्या लॉकडाउनचा निर्णय घेतल्यास लोकांची ज्या ठिकाणी मोठी गर्दी होते अशी ठिकाणी बंद ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. लॉकडाउन लागू झाल्यास मल्टिप्लेक्स, सिनेमा हॉल, बीच, गार्डन्स, सभागृह आणि मॉल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. तसेच स्टँडअलोन शॉप्स चालविण्यासाठी विशिष्ट वेळा दिल्या जातील. तसेच मोठ्या बाजारपेठा कडक मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच सुरू राहतील असे समजते.
क्लिक करा आणि वाचा-
दुसरा लॉकडाउन लागू झाल्यास उपनगरीय रेल्वे वाहतूक, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सार्वजनिक परिवहन बस सेवांना कडक नियमांचे पालन करावे लागण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर चाचण्या अधिक काटेकोरपणे करण्यात येतील. उत्पादन क्षेत्र बंद करण्यात येणार नसले तरी देखील त्यांना कडक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times