नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत वादग्रस्त मजकुर होता, असे यांचे म्हणणे आहे. या प्रश्नपत्रिकेत केंद्र सरकारसंबंधित एक प्रश्न होता. हा प्रश्न विचारताना भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख असणे अपेक्षित होते. मात्र त्या जागी चक्क आवर्जून “मोदी सरकार”असा उल्लेख करण्यात आला, असे नमूद करतानाच असा उल्लेख नेमका काय उद्देश आहे?, असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे. लोकसेवा आयोगाला सुद्धा राजकारणाची बाधा झालीय का?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
याच परीक्षेत पुन्हा काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती स्वीकारली असा तथ्यहीन आरोप करण्यात आला आल्याचे त्या म्हणाल्या. या वरून जाणीवपूर्वक पक्षाची बदनामी करण्याचा हा कुटील डाव असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा अर्थ लोकसेवा आयोगाला सुद्धा आता संघाच्या दावणीला बांधण्याचा पद्धतीशीरपणे प्रयत्न होत आहे. त्याचाच हा एक भाग आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
हा सारा प्रकार नकळत घडला असे अजिबात नसून यामागे मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी, अशीही मागणी पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times